‘ही’ सौंदर्यवती आहे लोकसभेची खासदार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – काल जाहीर झालेल्या लोकसभेच्या निकालात अनेक जेष्ठ नेत्यानी बाजी मारली. त्याचप्रमाणे कलाविश्वातील अनेक कलाकारही या लोकसभेच्या रिंगणात होते. त्यातील काही कलाकारांनी या निवडणूकीत बाजी मारत लोकसभेत प्रवेश केला.

यामध्ये सनी देओल, जया प्रदा, उर्मिला मातोडकर आदी कलाकारांचा समावेश होता. त्याचप्रमाणे पश्मिम बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहां ही देखिल लोकसभेच्या रिंगणात होती. यामध्ये भाजपकडून सनी देओल आणि कॉंग्रेसकडून नुसरत जहां यांनी लोकसभेची निवडणूक लढवून विजय मिळवला. या निवडणूकीमध्ये नुसरतने तीन लाख ५० हजार ३६९ मतांनी विजय मिळवला.

नुसरत जहाने निवडणूकीत विजय मिळविल्यानंतर तिचे सोशल मिडियावर फोटो व्हायरल होत आहे. नुसरतचे फोटो पाहिल्यावर कोणाला विश्वात बसणार नाही की ती पश्मिम बंगालमधील नवीन खासदार आहे. नुसरत ही आधी बंगाली चित्रपट सृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून ओळखली जायची आती ती अभिनेत्रीसोबतच सुंदर खासदार म्हणून ओळखली जाईल.

नुसरतने २०११ साली बंगाली चित्रपट ‘शोत्रू’ मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने पूजा नावाच्या मूलीची भूमिका साकारली होती. त्यावेळी तिच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. नुसरत ही पश्मिम बंगालमधील कोलकातामध्ये राहत आहे. तिने अनेक बंगाली चित्रपटात काम केले आहे. तिने छोट्याशा चित्रपट करिअरमध्ये अनेक मोठ्या-मोठ्या कलाकारांसोबत काम देखील केले आहे.