Photos : सारा तेंडुलकरवर वडिलांचे पैसे वाया घालवण्याचे आरोप कोणी केले?

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  भारतरत्न व भारताचा माजी क्रिकेटर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरचे तिच्या सोशल मीडियावर अनेक म्हणजे लाखो चाहते आहेत.

साराने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता ज्यात स्टारबक्स कॉफीचा मग दिसत होता व साराने “ब्लू टोकाय कॉफी..जीव वाचवते” असं कॅप्शन दिलं होतं. मात्र साराच्या या पोस्टला एका युजरने रिप्लाय दिला की, ” वडिलांचा पैसा वाया घालवतेय.” यावर साराने गप्प न बसता त्या युजरला उत्तर देत म्हंटलं, “कॅफेनवर खर्च केलेला पैसा म्हणजे वाया घालवणं नाही तर योग्य खर्च करणं आहे…LOL” असं उत्तर साराने त्याला दिलं आहे. साराने या युजरला दिलेल्या उत्तराचे स्क्रीनशॉट तिच्या इन्स्टास्टोरीला शेअर केले.

Sara Tendulkar Instagram Story.jpg

 

याआधीदेखल याच युजरने साराला ट्रोल केलं होतं. साराने अर्जुन तेंडुलकरने मुंबई इंडियनच्या जर्सीसाठी फोटोशूट केल्याची एक पोस्ट शेअर केली होती. यावर “सर्वात स्वस्त मुलगा” अशी  कमेंट केली होती. साराने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये ही कमेंट दिसत आहे.