भारताच्या ‘अंजली’चे पाकिस्तानच्या समलिंगी ‘सुंदास’वर प्रेम !

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था –  सोशल मिडियावर एक असा फोटो व्हायरल होत आहे ज्याने सीमा, धर्म, जात, लिंग सर्वाच्या परिसीमा गाठल्या आहेत. हे फोटो यामुळे विशेष आहेत की यात एका देशातील मुलीने दुसऱ्या देशातील मुलीवर प्रेम केले आहे आणि हे देश आहेत भारत आणि पाकिस्तान.

न्युयॉर्कमधील एका समलिंग जोडप्याचे फोटोशूट सध्या सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे आणि त्याला खूप पसंत देखील केले जात आहे. या फोटोशूटमध्ये एकाच छत्रीखाली थांबलेले दोन हसणारे चेहरे दिसत आहेत, या दोघींच्या जोडीला लोक पसंती देत आहेत आणि फोटोंचे देखील कौतूक केले जात आहेत. हा फोटो यामुळे आधिक प्रसिद्ध होत आहे की या दोघी मुली भारत आणि पाकिस्तानमधील आहेत. या फोटोमध्ये भारतातील अंजली चक्रा आणि पाकिस्तानची सुंदास मलिक आहेत, ज्या पावसात एका छत्री खाली उभ्या असल्याचे आहेत.

यात या दोघींनी पारंपारिक पेहराव केला आहे आणि त्यावर पारंपारिक दागिने देखील घातले आहेत. या दोघीही त्यांचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करतात. या दोघींनी आपल्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत म्हणले आहे की ‘अ न्यूयॉर्क लव स्टोरी.’ सरोवर अहमद नावाच्या एका फोटोग्राफरने या जोडीला अ‍ॅनिवर्सरीच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना अंजलीने देखील शेअर केले आहे.

आरोग्यविषयक वृत्त –