संतापजनक ! शिक्षकाकडून 12 वर्षीय विद्यार्थीनीवर बलात्कार, झाली ‘प्रेग्नंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केरळमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली असून शिक्षकाने आपल्या वर्गातील विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे हि 12 वर्षीय विद्यार्थिनी गरोदर राहिल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात हि घटना घडली आहे. पीडित मुलगी हि सातवी इयत्तेत शिकणारी असून या घटनेनंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे. मागील दोन महिन्यांपासून हा शिक्षक या मुलीचे लैंगिक शोषण करत होता. मात्र सुरुवातीला मुलीच्या कुटुंबियांना याची अजिबात माहिती नव्हती मात्र शंका आल्याने त्यांनी मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता हि घटना उघडकीस आली. या घटनेचा मुलीला मोठा मानसिक धक्का बसला आहे.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी शिक्षाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरारी शिक्षकाचा शोध घेतला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –