‘प्रेग्नंट’ असताना शरीर ‘संबंध’ ठेवणं कितपत सुरक्षित ? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात ‘ते’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गर्भवती महिलांना प्रेग्नंसीच्या काळात खूप काळजी घ्यावी लागते. कोणत्याही चुकीमुळे गर्भपात होऊ शकतो. अशावेळी अनेक कपल संबंध ठेवणंही टाळतात. कारण गर्भासाठी हे चागलं नाही असं त्यांना वाटतं. काही लोक प्रेग्नंसीच्या 3 महिन्यानंतर संबंध ठेवणं बंद करतात. मेडिकल सायंस लोकांधील या गैरसमजाचं खंडन करतं. डॉक्टर सांगतात या काळात महिलांमध्ये सेक्सची इच्छा जास्त असते. प्रेग्नंसीमध्ये महिलांसाठी सेक्स जास्त आनंददायी असतो.

डॉक्टर सांगतात, “लैंगिक संबंध पार्टनरशी जोडलं जण्याचं एक चांगलं माध्यम आहे. या स्थितीत रक्तप्रवाह चांगला असल्यानं महिला संबंध जास्त एन्जॉय करतात याशिवाय त्यांचा सेक्स ड्राईव्हदेखील वाढतो. त्यामुळे ते संबंधांना जास्त एन्जॉय करतात. प्रेग्नंसीदरम्यानच्या संबंधांच्या अफवांना घाबरण्याऐवजी ते नीट समजून घ्यायला हवं. प्रेग्नंसीच्या कोणत्याही स्टेजमध्ये संबंधांचा आनंद घेतला जाऊ शकतो. यात कसला धोका नाही. फक्त तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी.”

प्रेग्नंसीदरम्यान संबंध ठेवताना ही काळजी घ्या
प्रेग्नंसीदरम्यान संबंध ठेवताना सर्वात महत्त्वाचा मुद्द आहे तो म्हणजे स्वच्छता.
यावेळी कंडोमचा वापर करायला विसरू नका.
या काळात संबंध ठेवताना पार्टनरचा कम्फर्ट झोन आणि पोजिशनची काळजी घ्या.
ऑन द टॉप ही पोजिशन सर्वात सेफ मानली जाते.

प्रेग्नंसीदरम्यान कधी ठेवू नये संबंध ?
जर ब्लिडींग जास्त होत असेल तर अशावेळी डॉक्टर संबंध ठेवू नका असं सांगतात.
दुसरं म्हणजे एमनॉयटीक फ्लूड लीक झाल्यानं बाळाच्या जीवाला धोका निर्माण होतो. या स्थितीतही संबंध ठेवू नयेत.
दुर्बल गर्भधारणा म्हणजे तुमचा पेल्विक फ्लोर बाळ आणि लैंगिक संबंधांना सपोर्ट करण्यासाठी सक्षम नाही. अशा स्थितीत संबंध ठेवू नये. त्वरीत तपासणीही करून घ्या.
जर यापूर्वी तुमच्यासोबत मिसकॅरेजची घटना घडली असेल तर संबंध ठेवण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
जर गर्भात जुळं(ट्विन्स) किंवा तीळं(ट्रीपलेट्स) असेलर तर अशा स्थितीत संबंध ठेवल्यानं प्रेग्नंसीमध्ये कॉम्प्लिकेशंस येऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – 

You might also like