PI Rajesh Khandve Arrested | वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना अटक, जाणून घ्या प्रकरण

Police Inspector Arrested In Robbery Case | Thane Rural Police Inspector Nitin Bhikaji Vijaykar Arrested In Robbery Case Navi Mumbai Vashi Police

गडचिरोली : पोलीसनामा ऑनलाइन – PI Rajesh Khandve Arrested | आपल्या विरोधात आदेश दिल्याच्या रागातून न्यायाधीशांच्या घरी जाऊन त्यांच्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी वादग्रस्त पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे (Maharashtra Police Inspector Arrested). खांडवे यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांची रवानगी चंद्रपूरच्या कारागृहात (District Jail Chandrapur) करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षकास अटक झाल्याने गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. (PI Rajesh Khandve Arrested)

 

याबाबत अधिक माहिती अशी की, अतुल गण्यारपवार (Atul Ganyarpawar) यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर यापुर्वी गंभीर आरोप केले होते. चामोर्शी बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान 20 एप्रिल 2023 रोजी पहाटे आपल्याला पोलिस स्टेशनमध्ये (Chamorshi Police Station) बोलावून बेदम मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्याविरूध्द कडक कारवाई व्हावी यासाठी चामोर्शीमध्ये मोठे आंदोलन देखील झाले होते. दरम्यान, खांडवे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणुन अतुल गण्यारपवार यांनी चामोर्शी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी (Chamorshi Court) यांच्या न्यायालयात धाव घेतली होती. (PI Rajesh Khandve Arrested)

 

प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी. मेश्राम Judge N.D. Meshram (Nitin Dhanraj Meshram) यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांच्यावर भादंवि (IPC) 294, 324, 326, 342 नुसार गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले होते. दि. 25 मे 2023 रोजी पीआय राजेश खांडवे हे न्यायाधीश एन.डी. मेश्राम यांचया निवासस्थानी गेले होते. खांडवेंनी मेश्राम यांच्याशी बराच वेळ हुज्जत देखील घातली होती. त्यानंतर पोलिस निरीक्षक खांडवे यांच्यावर भादंवि 323, 353, 452 नुसार देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक नीलोत्पल (IPS Neelotpal)
यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना तडकाफडकी निलंबीत देखील केले होते.
दि. 2 जून 2023 रोजी पोलिस उप अधीक्षक साहिल झरकर (DySP Sahil Zarkar) यांनी पोलिस निरीक्षक राजेश खांडवे यांना गडचिरोलीमधून ताब्यात घेतले. त्यांना अटक करून चामोशी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. त्यानंतर त्यांना चंद्रपूर येथील जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे. पोलिस निरीक्षकास अटक झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

Web Title :  PI Rajesh Khandve Arrested | Controversial Gadchiroli Chamorshi police inspector Rajesh Khandve arrested, know the case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Total
0
Shares
Related Posts