गणेश चतुर्थीनिमित्त Vespa आणि Aprilia Scooters वर मिळतोय 20,000 पर्यंतचा फायदा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Piaggio India ने गणेश चतुर्थीनिमित्त Aprilia आणि Vespa स्कूटरच्या श्रेणीवर फेस्टिव्ह ऑफर दिल्या आहेत. ही फेस्टिव्ह ऑफर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान या निवडक राज्यांमध्ये आहे. या खास ऑफर अंतर्गत ग्राहकांना मोठा कॅशबॅक मिळण्याची संधी मिळणार आहे. जाणून घेऊया स्कूटर खरेदी केल्यावर तुम्हाला किती फायदा होईल…

ऑफर
या ऑफरमध्ये Piaggio India सध्या Vespa SXL, VXL 125, 150 मॉडेल, Aprilia SR 160, SR 125 आणि Storm 125 स्कूटरच्या खरेदीवर २०,००० रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळण्याची संधी आहे. ही ऑफर केवळ निवडक राज्यांमधील कंपनीच्या डीलरशिपवर मिळत आहे. ही ऑफर स्कुटरच्या ऑनलाइन बुकिंगसाठी लागू असणार नाही.

गणेश चतुर्थी भारतात उत्सवाची सुरुवात करते, जो वाहन खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. ही ऑफर या महिन्याच्या अखेरीस म्हणजे ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत लागू असेल. या घोषणेनंतर Piaggio फेस्टिव्ह सीजनसाठी ऑफर देणारी पहिली दुचाकी निर्माता कंपनी बनली, ज्यामुळे डीलरशिपला मागील महिन्यात झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर जे लोक ऑनलाइन स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांनाही Piaggio संपूर्ण श्रेणीवर २००० रुपयांपर्यंतचे फायदे देत आहेत.

कंपनीने गेल्या महिन्यात BS6 Aprilia आणि Vespa स्कूटर भारतात आणली होती. 2020 Vespa VXL, SXL 125 आणि 150 BS6 स्कूटर नवीन एलईडी हेडलाईटसह इंटिग्रेटेड डीआरएल, यूएसबी मोबाइल चार्जिंग पोर्ट आणि बूट लाइट सारख्या वैशिष्ट्यांसह सुसज्ज आहे. भारतीय बाजारात Vespa श्रेणीची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत १.१० लाख रुपये आहे. Aprilia Storm 125 डिस्क ब्रेक आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट कन्सोलने सुसज्ज आहे. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९१,३२१ रुपये आहे. त्याचबरोबर त्याच्या सर्वात किफायतशीर स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ८५,४३१ रुपये आहे. तर Aprilia SR 160 सर्वात महाग स्कूटर आहे आणि त्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.१२ लाख रुपये आहे. कंपनीची SR 160 सर्वात पॉवरफुल स्कूटर आहे, ज्यामध्ये 160cc चे BS6 इंजिन आहे, जे 10.8 bhp ची पॉवर आणि 11.6 Nm टॉर्क जनरेट करते.