60 च्या दशकातील आठवणी झाल्या ताज्या, Vespa रेसिंग सिक्सटीज स्कूटर लाँच, जाणून घ्या किंमत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पियाजियो इंडियाने भारतीय बाजारात आपली लोकप्रिय स्कूटर वेस्पा रेसिंग सिक्सटीज सादर केली आहे. ग्राहकांना या स्कूटरची मोठ्या कालावधीपासून प्रतिक्षा होती. कंपनीने ही स्कूटर ऑटो एक्सपो-2020 मध्ये सादर केली होती.

या स्कूटरची सर्वात मोठी खासियत म्हणजे, तिची ग्राफिक स्कीम 1960 च्या रेसिंग लिव्हरीजशी इन्स्पायर्ड आहे. पियाजियोने मार्चमध्येच ती लाँच करण्याचा प्लॅन केला होता, परंतु कोरोना संकटामुळे हे लाँचिंग लांबले.

लुकबाबत बोलायचे तर वेस्पा रेसिंग सिक्सटीज स्कूटर पहिल्या नजरेतच पसंत येईल, तिच्यात इन्डीकेटर-माऊंटेड अ‍ॅप्रन, स्मोक्ड विंडस्क्रीन, गोल्ड कलर्ड व्हील्स दिले आहेत. याशिवाय स्कूटरमध्ये युएसबी चार्जर दिला आहे.

प्रीमियम लुक असलेल्या या स्कूटरमध्ये अनक आकर्षक फीचर्स आहेत, तिच्यात अंडर-सीट लाइट देण्यात आली आहे. स्कूटरमध्ये रेड आणि गोल्ड ग्राफिक्ससोबत व्हाईट बेस कलर आहे. हेडलाइट सराऊंड, मिरर्ससह अ‍ॅग्जस्ट कॅनवर मॅट ब्लॅकचा वापर केला आहे.

स्कूटर कंपनीने दोन वेरियंट्समध्ये लाँच केली आहे. 150सीसी वेरियंटमध्ये थ्री-व्हॉल्व, एयर-कूल्ड, फ्यूअल-इंजेक्टेड इंजिनचा वापर केला आहे, जे 7,600आरपीएमवर 10.2 बीएचपीची पॉवर आणि 5,500 आरपीएमवर 10.6 एनएमचा टार्क निर्माण करते. तर दुसर्‍या 125 मॉडलमध्ये 125 सीसीचे तीन-व्हॉल्व इंजिन दिले आहे, जे 9.7 बीएचपी पॉवर आणि 9.6 एनएमचा टार्क निर्माण करते.

चांगल्या हँडलिंगसाठी वेस्पामध्ये सिंगल-चॅनल एबीएस दिले आहे. तर रायडरच्या सुरक्षेसाठी तिच्या फ्रंट व्हीलमध्ये डिस्क ब्रेक दिला आहे, आणि रियर साईडमध्ये ड्रम ब्रेक दिला आहे. स्कूटरमध्ये ऑटोमॅटिक सीव्हीटी गियरबॉक्स दिला आहे.

किंमतीबाबत बोलायचे तर रेसिंग सिक्सटीज च्या 125 सीसी वेरियंटची किंमत 1.20 लाख रुपये आणि 150 सीसी वेरियंटची किंमत 1.32 लाख रुपये ठेवली आहे. दोनही स्कूटर बीएस 6 कम्प्लायंटसोबत लाँच केल्या आहेत. तुम्ही ही स्कूटर ऑनलाइन बुकिंग करू शकता.