Homeताज्या बातम्यादावा : 'जनधन' खात्यांमधून रोकड काढण्यासाठी द्यावे लागतील 100 रुपये , जाणून...

दावा : ‘जनधन’ खात्यांमधून रोकड काढण्यासाठी द्यावे लागतील 100 रुपये , जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   खात्यांमधून रोकड काढून घेण्यासंबंधितच्या तीन बातम्या लोकांना त्रास देणाऱ्या होत्या. यासंदर्भातील पहिल्या बातमीत म्हटले गेले की, आता सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी आणि जमा करण्याच्या शुल्कामध्ये वाढ करणार आहेत. दुसर्‍या बातमीत असा दावा केला गेला की, जन धन खात्यांमधून रोख रक्कम काढण्यासाठी 100 रुपये आकारावे लागतील. तिसर्‍या बातमीत असा दावा केला की, बँक ऑफ बडोदाने रोख जमा आणि बचत खात्यात पैसे काढण्यावरील शुल्क वाढवले आहे. पण आता पीआयबी फॅक्ट चेकने हे तिन्ही दावे खोटे असल्याचे घोषित केले आहेत. पीआयबीने याबाबत एक ट्विट जारी केले आहे.

 

दरम्यान, पीआयबी ही एक सरकारी संस्था आहे, जी वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना भारत सरकारचे धोरण, कार्यक्रमाचे पुढाकार आणि इतर कामगिरीबद्दल माहिती देते. अलीकडेच, पीआयबीने बनावट बातम्यांवर कडक कारवाई करण्यासाठी फॅक्ट चेकचे काम सुरू केले आहे. याअंतर्गत दिशाभूल करणार्‍या माहितीची तपासणी केली जाते जेणेकरुन लोकांना योग्य माहिती मिळू शकेल.

 

पहिल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, एका मीडिया रिपोर्टमध्ये दावा केला गेला आहे की, सार्वजनिक क्षेत्रातील काही मोठ्या बँकांनी रोख जमा आणि बचत खात्यात रोख रक्कम काढण्यासाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. हा दावा खोटा असल्याचे पीआयबी फॅक्ट चेकने तपासणीनंतर सांगितले आहे. या बँकांनी बचत खात्यांमधील रोख रक्कम जमा आणि रोख रक्कम काढण्याचे शुल्क वाढविण्याचा कोणताही निर्णय घेतला नाही.

 

त्याचप्रमाणे दुसर्‍या ट्वीटमध्ये असेही म्हटले आहे की, # जन धन खात्यांमधून प्रत्येक रोख रक्कम काढण्यासाठी 100 रुपये आकारले जातील. पीआयबी फॅक्ट चेक म्हणते की, हा दावा खोटा आहे. जनधन खात्यांच्या विनामूल्य बँकिंग सेवांसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.या संदर्भात आरबीआयच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाते.

 

तिसर्‍या ट्विटमध्ये असे लिहिले आहे की, बँक ऑफ बडोदाने रोख जमा आणि बचत खात्यात रोख रक्कम काढण्यासाठी चार्ज वाढविला आहे. पीआयबी फॅक्ट चेक म्हणते की, हा दावा खोटा आहे. बँक ऑफ बडोदाने बचत खात्यांमध्ये रोकड ठेव आणि रोख रक्कम काढण्याचे शुल्क वाढवले नसल्याची माहिती दिली आहे.

 

आपण दिशाभूल करणार्‍या बातम्यांविरूद्ध करू शकता तक्रार

 

दरम्यान, सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य किंवा बनावट आहे, त्याबद्दल शोधण्यासाठी आपण पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेऊ शकता. पीआयबी फॅक्ट चेकवर कोणीही स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा व्हॉट्सअ‍ॅप नंबर 918799711259 पाठवू किंवा [email protected] वर मेल करू शकतात.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News