मोदी सरकार ‘महिला स्वरोजगार योजना’ अंतर्गत महिलांच्या खात्यात टाकतेय 1 लाख रुपये ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना युगात सोशल मीडियावर बनावट बातम्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. आगामी काळात बनावट मेसेजद्वारे अनेक दावे केले जात आहेत. आजकाल, आणखी एक संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दावा केला जात आहे की, केंद्र सरकार महिला स्वरोजगार योजनेंतर्गत सर्व महिलांना त्यांच्या बँक खात्यात 1 लाख रुपये देत आहे. पण भारत सरकारच्या पीआयबी या संस्थेने या व्हायरल मेसेजचा खुलासा केला आहे. जाणून घ्या सत्य …

पीआयबीकडून हा दावा खोटा असल्याची पुष्टी केली आहे. महिला स्वरोजगार यासारखी कोणतीही योजना केंद्र सरकार चालवित नाही. कोरोना काळातील बेरोजगारीमुळे अशा बनावट बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. भारत सरकारच्या प्रेस इन्फर्मेशन ब्युरोने या व्हायरल बातमीचे खंडन करत म्हटले की, सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोरोना कालावधीत अशा बनावट बातम्यांचा प्रसार होऊ नये म्हणून सरकारनेही अनेक प्रयत्न केले आहेत.

PIB Fact Check –
पीआयबी फॅक्ट चेक केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी हे जाणून घेण्यासाठी पीआयबी फॅक्ट चेकची मदत घेतली जाऊ शकते. एक पीआयबी फॅक्ट चेकवर व्हाट्सएप नंबर 918799711259 वर स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा यूआरएल पाठवू शकतो किंवा [email protected] वर मेल करू शकतो.