Fact Check : Broiler Chicken खाल्ल्यानं होतो ‘कोरोना’ वायरस ? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीच्या काळात सोशल मीडियावर रोज असंख्य फेक न्यूज तसेच चुकीची माहिती वायरल होत आहे. या चुकीच्या माहितीला तोंड देणे सुद्धा एक आव्हानच आहे. ट्विटर, व्हॉट्सअप आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेयर केल्या जात आहेत. अशीच एक चुकीची माहिती सोशल मीडियावर वायरल होत आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की, ब्रॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळला आहे.

पोल्ट्री उद्योग झाला बरबाद
कोरानाच्या सुरूवातीच्या काळात सुद्धा अशी चुकीची माहिती सर्वत्र पसरल्याने कोरोना व्हायरसच्या भितीने लोकांनी चिकन खाणे बंद केले. ज्यामुळे पोल्ट्री इंडस्ट्रीला अजूनही फटका बसत आहे. पोल्ट्री उद्योग आणि याच्याशी संबंधित कामगार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच खाद्य पुरवठा करणारा उद्योग सुद्धा अडचणीत आहे.

पोल्ट्रीशी संबंधीत उद्योग उध्वस्त
पोल्ट्री उद्योगाला फीडिंग सिस्टम, मॅन्युअल फीडर, वॉटर सिस्टम, ड्रिंकर हीटिंग सिस्टम, व्हेंटिलेटर इत्यादी उपकरणे पुरवणार्‍या कंपन्यांवर वाईट परिणाम झाला आहे. या कंपन्यांनी म्हटले आहे की, मागणी ठप्प झाली आहे, आणि कोणतेही नवीन प्रोजेक्ट सुद्धा येत नाहीत.

काय आहे प्रकरण
वायरल होत असलेल्या या दाव्याची एक कॉपी प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो ऑफ इंडियाच्या (पीआयबी) च्या फॅक्ट चेक हँडलद्वारे शेयर करण्यात आली आहे, ज्यामध्ये लिहिले आहे की, ब्रॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढळला आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की, तुम्ही ब्रॉयलर चिकन खाऊ नये आणि कृपया हे सर्वठिकाणी शेयर करा.

पीआयबी फॅक्ट चेकने हा मजकूर फेटाळत हा मॅसेज फेक असल्याचे सांगितले. पीआयबी फॅक्ट चेकनुसार, ब्रॉयलर चिकनमध्ये कोरोना व्हायरस आढल्याचा अजूनपर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही.

एच5एन1 आणि कोरोना व्हायरस दोन वेगवेगळे इन्फेक्शन आहेत. एच5एन1 एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे संपर्कात आल्याने पसरत नाही. माणसांमध्ये इन्फ्लुएंजा-ए व्हायरसचा सबटाईप एच5एन1चा उपचार अँटी व्हायरल औषधांनी शक्य आहे.

जगातिक आरोग्य संघटनेनुसार हा संसर्ग अजूनपर्यंत जनावरांमध्ये पसरल्याचा कोणताही पुरावा नाही. मांस, मासे, अंडे आणि दूधाचे सेवन सुरक्षित प्रकारे केले जाऊ शकते. यासाठी वायरल मॅसेजमध्ये ब्रॉयलर चिकनमध्ये कोविड-19 आढळल्याचा दावा फेक आहे.