Fact Check : व्हॅक्सीन घेतलेल्या हाताला विजेचा करंट, पेटतो बल्ब? जाणून घ्या ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात काही लोक व्हॅक्सीनबाबत Vaccine संभ्रम पसरवत आहेत. पण सत्य हे आहे की, सध्या कोरोनापासून बचावासाठी व्हॅक्सीन सर्वात आवश्यक आहे आणि प्रत्येकाने व्हॅक्सीन घेतली पाहिजे. या दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने वायरल होत आहे, ज्यामध्ये व्हॅक्सीन बाबत हैराण करणारा दावा केला जात आहे. सोशल मीडियावर शेयर करण्यात असलेल्या एका व्हिडिओमध्ये दावा केला जात आहे की, कोविड-19 च्या लसीकरणानंतर, लस घेतलेल्या दंडात वीज तयार होते.

‘औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे, त्याप्रमाणे चंद्रकांत पाटलांना अजितदादा दिसतात’

व्हिडिओमध्ये एक व्यक्ती दावा करत आहे की, दंडावर ज्या ठिकाणी व्हॅक्सीन Vaccine दिली आहे, तिथे विजेचा बल्ब टच केल्याने तो पेटतो. तर व्हॅक्सीनवाल्या हातावरून बल्ब हटवून दुसर्‍या हातावर टच केल्यानंतर पेटत नाही. व्यक्तीचा दावा आहे की, व्हॅक्सीनच्या ठिकाणी करंट आहे आणि यामुळे बल्ब पेटतो. प्रकरण व्हॅक्सीन बाबत होते, यासाठी सरकारी फॅक्ट चेक एजन्सी पीआयबी फॅक्ट चेकने हे गांभिर्याने घेत याची पडताळणी केली. तपासानंतर एजन्सीने हा दावा बनावट असल्याचे म्हटले. पीआयबी फॅक्ट चेकनुसार व्हिडिओमध्ये व्हॅक्सीनबाबत दावा केला जात आहे तो एकदम बनावट आहे.

फॅक्ट चेक एजन्सीनुसार, कोविड-19 च्या लशीत धातु किंवा मायक्रोचिप नसते, आणि व्हॅक्सीन घेतल्यानंतर शरीरात कोणताही चुंबकीय प्रभाव किंवा विद्युत प्रवाह उत्पन्न होत नाही. म्हणजे बल्ब पेटण्याचा दावा एकदम चुकीचा आहे. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले की, कोरोना व्हॅक्सीन पूर्ण सुरक्षित आहे. ती घेतल्याने शरीरात वीज निर्माण होण्याचे वृत्त चुकीचे आहे, केवळ लोकांची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने असे दावे केले जातात. एजन्सीने लोकांना साावध केले की, बनावट माहितीवर विश्वास ठेवू नका, लसीकरण आवश्य करा.

Also Read This : 

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, बॉम्बशोधक पथक दाखल; तपास सुरु

लैंगिक संबंध ठेवल्यानंतर कशी आणि किती दिवसात गर्भधारणा होते ? जाणून घ्या

ब्लॅक, व्हाईट फंगसनंतर भारतात अ‍ॅस्परगिलोसिसची प्रकरणे आली समोर; जाणून घ्या लक्षणं, कारणे आणि बचावाचे उपाय

शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ पाटील यांचे स्पष्टीकरण, म्हणाले – ‘… तो Video 2 वर्षांपूर्वीचा, भाजपाने घरगुती वादाचा गैरफायदा घेऊ नये’