PIB Fact Check | कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपये देत आहे मोदी सरकार? जाणून घ्या पूर्ण ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PIB Fact Check | सोशल मीडियावर एक बातमी सध्या वेगाने वायरल होत आहे. या बातमीत म्हटले आहे की, कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी मोदी सरकार प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना (Pradhanmantri Ramban Suraksha Yojana) अंतर्गत 4000 रुपयांची आर्थिक मदत देत आहे. हा दावा खरा आहे की खोटा याबाबत आता सरकारकडून माहिती देण्यात आली आहे. पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने हा हा दावा बनावट असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारद्वारे अशी कोणतीही योजना चालवली जात नाही.

काय केला जात आहे दावा
वायरल बातमीत दावा करण्यात आला आहे की, प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजनेच्या अंतर्गत कोरोना व्हायरसच्या निःशुल्क उपचारासाठी सर्व तरूणांना 4000 रुपयांची मदत रक्कम मिळेल.

रजिस्ट्रेशन करण्यासाठी देण्यात आलेल्या लिंकवर क्लिक करून आपला फॉर्म भरा. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2021 आहे, त्वरा करा. मला 4000 रुपये मिळाले. तुम्ही सुद्धा दिलेल्या लिंकवरून अर्ज प्राप्त करा.

‘PIB फॅक्ट चेक’ने काय म्हटले?
सरकारी संस्था प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) ने या मेसेजचे फॅक्ट चेक केले.
फॅक्ट चेकमध्ये म्हटले आहे की मोदी सरकारद्वारे अशी कोणतीही योजना (प्रधानमंत्री रामबाण सुरक्षा योजना) चालवली जात नाही.
अशा बनावट वेबसाइटवर आपली वैयक्तिक माहिती शेयर करू नका.

Web Title :- pib fact check govt giving rs 4000 for treatment of coronavirus under pradhanmantri ramban suraksha yojana

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nitin Landge Bribe Case PCMC | स्थायी समितीच्या माध्यमातून जनतेच्या पैशाचा अपहार; चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करावा – आम आदमी पार्टीची मागणी

Tata Steel Company | टाटा स्टीलमध्ये काम करणार्‍यांसाठी खुशखबर ! कंपनीने केली एकुण 270.28 कोटींच्या बोनसची घोषणा

RBI New Guideline on Bank Lockers | बँक लॉकरसाठी RBI ची नवीन गाईडलाईन, चोरी झाल्यास 100 पट मिळेल भरपाई; जाणून घ्या