PIB Fact Check | अर्थ मंत्रालय तुम्हाला सुद्धा देईल दरमहिना 1.30 लाख रुपये कॅश? जाणून घ्या काय आहे पूर्ण प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PIB Fact Check | अर्थ मंत्रालय (Finance Ministry) 1.30 लाख रुपये दरमहिना इमर्जन्सी कॅश वाटत आहे, असा मेसेज सध्या सोशल मीडियावरून अनेकांना येत आहे. जेव्हा PIB Fact Check ने हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्याच्या सत्यतेबाबत शोध घेतला. याबाबत जाणून घेवूयात सत्य.

PIB Fact Check ने जेव्हा याची पडताळणी केली तेव्हा हा मेसेज पूर्णपणे फेक असल्याचे स्पष्ट झाले. पीआयबीने सांगितले की, मंत्रालयाकडून अशा प्रकारचा कोणताही प्लान चालवला जात नाही.

पीआयबीने केले ट्विट

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या एका ट्विटमध्ये म्हटले की, एका व्हॉट्सअप मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, भारताचे अर्थ मंत्रालय लोकांना इमर्जन्सी कॅश देत आहे. 6 महिन्यासाठी 1.30 लाख रुपये महिना दिले जात आहेत.

 

पीआयबीने लोकांना दिला हा सल्ला

#PIBFactCheck मध्ये हा दावा बनावट असल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यांनी म्हटले की लोकांना सल्ला देण्यात येतो की, अशा कोणत्याही योजनेवर विश्वास ठेवू नये.
सरकारकडून प्रत्येक योजनेची माहिती मंत्रालयाकडून जारी केली जाते.
यासाठी प्रत्येक योजनेसंबंधी मंत्रालयाची वेबसाइट, पीआयबी आणि दुसर्‍या विश्वासू माध्यमांवर पडताळणी केल्यावरच अर्ज करा.
अशा प्रकारच्या माहितीला बळी पडल्यास नुकसान होऊ शकते.

Web Tital : PIB Fact Check | it is claimed in viral message that finance ministry is providing 130000 rs cash per month check reality

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

Shirur Police | शिरुरमध्ये गुटख्याची अवैध वाहतूक करणारा अटकेत, 14 लाखाचा मुद्देमाल जप्त

PM Modi | पीएम मोदी सोमवारी लाँच करतील e-RUPI, जाणून घ्या काय आहे ई-रुपी, कसे करते काम आणि काय होईल फायदा

Pune Crime | पुण्याच्या मंचरमध्ये दिवसाढवळ्या सराईतावर गोळीबार ! ओंकार उर्फ राण्याचा खात्मा, परिसरात खळबळ

Uddhav Thackeray | धमकी देऊ नका… एकच थापड देऊ, पुन्हा उठणार नाही, उद्धव ठाकरेंचा इशारा (व्हिडिओ)