PIB Fact Check | मतदान केले नाही तर बँक अकाऊंटमधून कट होतील 350 रुपये? जाणून घ्या वायरल मेसेजचे पूर्ण ‘सत्य’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – PIB Fact Check | सध्या सोशल मीडिया (social media) वर एक लेख वायरल होत असून यात दावा करण्यात आला आहे की, जे लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha elections) मतदान करण्यासाठी जाणार नाहीत त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोग (Election Commission) 350 रुपये कापून घेईल. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया सुद्धा येऊ लागल्या आहेत. या वायरल मेसेज (viral message) चे सत्य काय (PIB Fact Check) आहे ते जाणून घेवूयात…

 

काय आहे वायरल मेसेज?
एका लेखात हा दावा करण्यात आला आहे की, 2024 लोकसभा निवडणुकीत जो मतदार मताधिकाराचा वापर करणार नाही, निवडणुक आयोग त्याच्या खात्यातून 350 रुपये कापून घेईल. मतदान न करणार्‍यांविरोधात आयोगाने आदेश जारी केला आहे. मतदान न करणार्‍यांची ओळख आधारकार्डद्वारे पटवली जाईल. यानंतर पैसे कापले जातील.

यामध्ये असाही दावा केला आहे की, निवडणुक आयोगाने अगोदरच कोर्टाची मंजूरी घेतली आहे. मतदानासाठी आयोगाला खर्च येतो, हा खर्च वाया जात असल्याने ही वसूली केली जाणार आहे.

काय आहे या दाव्याची सत्यता?
PIB फॅक्ट चेकच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून हा वायरल मेसेज पूर्णपणे बनावट असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी लिहिले आहे की, लोकसभा निवडणुकीत जे मतदार आपल्या मतदानाचा वापर करणार नाहीत,
निवडणूक आयोग त्यांच्या बँक खात्यातून 350 रुपये कापून घेणार असल्याचा दावा बनावट आणि खोटा आहे.
निवडणूक आयोगाकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. अशा संभ्रम पसरवणार्‍या बातम्या शेयर करू नये. (PIB Fact Check)

 

कोणत्याही बातमी बद्दल शंका असेल तर पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ला माहिती द्या.
याशिवाय, या फोन नंबरवर 8799711259 किंवा [email protected] ईमेल आयडीवर सुद्धा तक्रार करू शकता,
किंवा ट्विटरद्वारे सुद्धा अशी माहिती पाठवू शकता.

 

Web Title :- PIB Fact Check | will rs 350 be deducted from the bank account for not voting know the full truth of this viral message

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Devendra Fadnavis | पुणे मनपावर भाजपचा भगवा आणि आरपीआयचा निळा फडकणारच – देवेंद्र फडणवीस (व्हिडीओ)

Sourav Ganguly | सौरव गांगुलींच्या टीमवर सचिव जय शहांची बॉलिंग पडली भारी, फक्त एका रनाने पराभव

Crime News | धक्कादायक ! Facebook वर मैत्री झाली अन् गुंगीचं औषध पाजून केला बलात्कार, अत्याचाराचा व्हिडीओ पाठवून मागितले 10 लाख