IAS अधिकार्‍याच्या दुसर्‍या पत्नीकडून ‘हंगामा’, नशेमध्ये संबंध ठेवून केलं जबरदस्तीनं ‘लग्‍न’

गुजरात : वृत्तसंस्था – महिलांचा लैगिंक छळ, अन्याय, अत्याचार या घटना अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. पण आता तर हद्दच झाली आहे. कारण गुजरात मधील एका जिल्हाधिकाऱ्याने नशेमध्ये लैगिंक छळ करून एका महिलेशी लग्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका जबाबदार सरकारी अधिकाऱ्याने असे गैरवर्तन करून माणुसकीला काळिमा फासला आहे.

या पार्श्वभूमीवर या अधिकाऱ्याने संबंधित महिलेला सॉफ़्ट ड्रिंकमध्ये दारू टाकून त्या महिलेला पाजले आणि तिच्या सोबत फोटो काढले. तसेच तिला हे फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिच्या सोबत जबरदस्ती लग्न केलं. असा दावा या महिलेने केला आहे. गुजरात मधील जिल्हाधिकारी गौरव दहिया यांचं पहिल लग्न झालं होत. तरी त्यांनी लिनु सिंह या महिलेचा लैगिंक छळ तसेच तिला धमकी देत तिच्याशी लग्न केलं.

दरम्यान या महिलेच्या ह्या आरोपावर उत्तर देताना दहिया म्हणाले की, लिनु सिंह या महिलेने मला आत्महत्येची धमकी देऊन तिच्यासोबत राहण्यासाठी मजबूर केलं होतं. आमच्या दोघांमधील संबंध हे आम्ही आमच्या मर्जीने ठेवेल होते. परंतु, लग्न आणि मुलीची गोष्ट खोटी आहे असे दहिया म्हणाले. यावर या महिलेचा असा दावा आहे की, दहिया यांनी मला सांगितलं होत की माझा माझ्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे. त्यांनी मला त्यांच्या घटस्फोटाचे खोटे कागदपत्र दाखवून माझ्यासोबत जबदस्तीने लग्न केले.

या महिलेने असा पण आरोप केला आहे की, तिला ज्या वेळेस गर्भ राहिला होता. तेव्हा ती गर्भपात करणार होती. पण दहियाने तिला तसं करू दिल नाही आणि ज्या रुग्णालयात तिची प्रसूती झाली होती. त्या रुग्णालयात तिचा नवरा म्हणून दहियाने सही केली आहे. तसेच तुम्ही डीएनए टेस्ट केली तर तुम्हाला लगेच समजेल असेही त्या महिलेने सांगितले. यावर या जिल्हाधिकाऱ्यांचे असे म्हणणे आहे की माझा माझ्या पत्नी सोबत घटस्फोट झाला आहे मी एकटाच राहत आहे.

आरोग्यविषयक वृत्त