पुण्यात लक्ष्मी रोडवर धक्का देऊन खिशातील 1 लाख लांबविले

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन – शहरातील वर्दळीचा आणि प्रसिद्ध असणाऱ्या लक्ष्मी रस्त्यावर एका तरुणाला ऐन 6 वाजण्याच्या सुमारास धक्कादेऊन 1 लाख रुपयांची रोकड दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी धर्माराम चौधरी (वय ३७, रा. बिबवेवाडी) यांनी फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धर्माराज होलसेल साडी विक्रेते आहेत. दरम्यान तीन दिवसांपुर्वी तुळशीबागेत एका दुकानदाराकडून साड्या विक्रीची दीड लाखांची रोकड घेउन रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी धर्माराज बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यानी त्यांना धक्का दिला. ते खाली पडल्याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या खिशातून एक लाख रुपयांची रोकड काढून घेतली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत अधिक तपास करीत आहेत.

पीएमपीत सोन्याची बांगडी चोरीला

शहरातील पीएमपीएल बसमध्ये प्रवासात सुरू असणाऱ्या चोऱ्यांच्या घटना सुरूच आहेत. टिळक रस्त्यावरन पीएमपीत प्रवास करणाऱ्या एका जेष्ठ महिलेच्या हातातील बांगडी चोरट्यांनी चोरून नेली आहे. याप्रकरणी जेष्ठ महिलेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र मंडळ बसस्थानकावरुन पीएमपीएलमध्ये वर चढत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या हातातील ६४ हजारांची सोन्याची बांगडी चोरुन नेली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत अधिक तपास करीत आहेत.