लग्नाच्या वऱ्हाडाच्या गाडीला भीषण अपघात, ९ जण ठार

हापुड : वृत्तसंस्था – लग्नानंतर घरी जात असलेल्या वऱ्हाडीच्या पिकअप व्हॅनला अज्ञात वाहनांने जोरदार धडक दिल्याने त्यात ९ जण ठार झाले असून १८ जण जखमी झाले आहेत. ही घटना हाफिजपूर परिसरातील बुलंद शहर महामार्गावरील सादिकपूर जवळ रविवारी रात्री ११ वाजता घडली.

सालेपूर कोटला गावात राहणाऱ्याच्या मुलीचा विवाह होता. वरात रविवारी सायंकाळी मेरठवरुन हापुड शहरातील एका मंगल कार्यालयात आली. तेथे विवाह पार पडल्यानंतर लोक एका पिकअप व्हॅनमधून रात्री गावाला परत जाण्यासाठी निघाले होते. पिकअप व्हॅनमध्ये २० ते २५ जण होते. काही जण तर व्हॅनच्या कडेच्या बोर्डवर उभे राहून प्रवास करीत होते. पिकअप व्हॅन सादिकपूर जवळ आली असताना अचानक समोरुन आलेल्या एका वाहनाने व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे बाहेरच्या बाजूला उभे राहून प्रवास करणारे उडून पडले. ही धडक इतकी जोरात होती की, व्हॅनची एक बाजूची बॉडी उखडली गेली. त्यात ९ जणांचा जागीच मृत्यु झाला. किमान १८ जण जखमी झाले असून त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like