गोळीबारानंतर आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावकडून दगडफेक

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पारधी समाजाच्या दोन गटात हाणामारी होऊन झालेल्या गोळीबारात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आरोपींची धरपकड करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने दगडफेक केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिसांनी अधिक कुमक मागून कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शनिवारी रात्री कळंब शहरातील साठे चौकात पारधी समाजातील दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. काठ्या, गलेर यांच्यासह बंदुकाचाही वापर यावेळी करण्यात आला. दोन्ही गटातील वाद विकोपाला गेल्याने जमावातील दोघांनी गोळीबार केला. यामध्ये विकास पवार आणि बापू धोत्रे या दोघांना छातीत गोळी लगल्याने ते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पिंटु पवार आणि सचिन काळे यांच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली. रात्री उशीरा पोलीस आरोपींना पकडण्यासाठी गेले असता जमावाने पोलिसांवर दगडफेक केली. सुदैवाने यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाले नाहीत. पोलिसांनी दगडफेक करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी २५ ते ३० जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे.

उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ७ उपाय

‘तळहात’ पाहून सुद्धा ओळखू शकता, तुम्हाला आहे कोणता आजार ?

‘या’ गोष्टींचे सेवन करणाऱ्या महिलांना कधीही होत नाही ‘ब्रेस्ट कॅन्सर’

रोज सकाळी ‘मनुक्यांचे पाणी’ प्या आणि मिळवा ‘हे’ आश्चर्यकारक फायदे

रक्ताचा अभाव, कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर ‘पांढरा कांदा’ उपयोगी

सावधान ! ‘गहू’ आरोग्यासाठी नुकसानकारक

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like