Photos : फुलराणीचा पारुपल्लीसोबत हॉट अंदाज

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहेत.

सायनाने समाज माध्यमात मालदीवच्या समुद्रकिनारीवरील पारुपल्ली सोबतचे फोटो शेअर केले आहेत.

सायना आणि पारुपल्ली कश्यप १० वर्षे एकत्र होते. त्यानंतर दोघांनी डिसेंबर २०१८ मध्ये लग्न केले.

सायनाने लंडन ऑलिम्पिकमध्ये कास्य पदक, तर कॉमनवेल्थमध्ये दोनवेळा सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.

जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत सायना पहिल्या क्रमांकावर होती.

तर पारुपल्ली कश्यप लंडन ऑलिम्पिकच्या क्वार्टर फायनलपर्यंत गेला होता. पारुपल्ली जागतिक क्रमवारीत २४ व्या क्रमांकावर आहे.

अलीकडेच सायना आणि पारुपल्ली यांनी डेनमार्क ओपनमधून माघार घेतली आहे.

२०२१ जानेवारीत होत असलेल्या आशियाई टूरमधून पुन्हा खेळण्यास सुरुवात करणार असल्याचे सायनाने सांगितले.