‘तशा’ चित्रपटांपासुन ‘लांब’च राहणं कॅटरीना कैफला आवडत, कारण तिला वाटते ‘त्या’ गोष्टींची भिती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ सहज घाबरते. त्यामुळे कॅट हॉरर सिनेमांपासून दूर राहते. कॅटने स्वत: आयएमडीबीची ओरीजनल सीरीज द इनसाइडर वाचलिस्ट मध्ये बोलताना या गोष्टीचा खुलासा केला आहे. तिला विचारण्यात आलं होतं की, अशी कोणती शैली आहे जिला आजपर्यंत तिने पाहिले नाही. त्यावर कॅट म्हणाली की, “हॉरर. मला खूपच भीती वाटते. हॉरर मला खूपच घाबरवतं आणि मला अजिबात घाबरण्याची इच्छा नाही.

हा सिनेमा पाहून अ‍ॅक्टर होण्याची इच्छा होते
कॅटने हेदेखील सांगितले की, तिला कशा प्रकारचे सिनेमे आवडतात. कॅट म्हणते की, “जुलिया रॉबर्ट्स, मेग रयान, हग ग्रांट चे सिनेमे तुमचा खराब मुड ठिक करू शकतात. स्लीपलेस इन स्टोर, प्रीटी वूमन, फोर वेडिंग अँड ए फ्युनेरल या सिनेमांमध्ये एक निर्दोषीपणा, सत्य, आनंदित करणारी वैशिष्ट्ये आहेत. मी क्लासिक सिनेमांची खूप मोठी फॅन आहे.” कॅटला जेव्हा विचारण्यात आले की, असा एखादा सिनेमा आहे का जो पाहून तुमच्या मनात अ‍ॅक्टर होण्याचा विचार आला ? यावर कॅट म्हणते, “हो असा सिनेमा आहे परंतु तो इंग्रजी सिनेमा आहे. त्याचं नाव आहे गॉन विद द विंड.”

View this post on Instagram

🌟

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on

कॅटने हे सिद्ध केले की…
तुम्हाला सांगू इच्छितो की, हिंदी सिनेमात आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात कॅटला आपल्या अभिनयाची पद्धत आणि ब्रिटीश लेहेजा असल्याने खूप टीका सहन करावी लागली होती. परंतु आता तिने सिद्ध केले आहे की, ती उत्तम अभिनय आणि चांगल्या प्रकारे नृत्य करू शकते. भारत सिनेमात तिने साकारलेल्या भूमिकेचे खपूच कौतुक होताना दिसत आहे.

‘कॅटरीना असामान्य आहे’
व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी नुकतंच एका मुलाखतीत कॅटरीनाबाबत भाष्य केल. त्या म्हणाल्या की, “कॅटरीना असामान्य आहे. आपल्या बोलण्याचा अ‍ॅक्सेंट सुधारण्यासाठी तिने घेतलेली कठोर मेहनत भारत सिनेमात स्पष्ट दिसत आहे. या सिनेमातील जुन्या जमान्यातील दृश्यात कॅटने आपला अ‍ॅक्सेंट आणि स्पीड दोन्हीही चांगल्या प्रकारे मेंटेन केलं आहे. ती या सिनेमात जशी दिसली आहे तशी ती याआधी कधीच दिसली नाही. भारतमध्ये ती कल्पनेपेक्षा जास्त चांगलं काम करताना दिसली आहे.”

 

आरोग्यविषयक वृत्त 

 श्वसनाचे आजार दूर करण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

‘दारू’ आणि ‘पेनकिलर’ एकत्र घेणे धोकादायक !

 

Loading...
You might also like