Photos : ‘चांद्रयान – 2’ पोहचलं चंद्राच्या जवळ, पाठवलं चंद्राचे ‘रहस्यमय’ फोटो

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्त्रोने अवकाशात पाठवलेले चांद्रयान जसजसे पुढील कक्षेत जात आहे, तसतसे विविध घटनाक्रम समोर येत आहेत. चांद्रयान साऊथ पोलच्या दिशेने वेगाने पुढे जात आहे. इस्त्रोने यासंबंधित माहिती उपलब्ध करुन दिली आहे. नुकतेच यासंबंधित फोटो इस्त्रोने सादर केेले आहेत.
चांद्रयान – 2 च्या कॅमेराने चंद्राचे काही फोटो पाठवले आहेत. ज्याला इस्त्रोने समोर आणले आहेत. चांद्रयान -2 ने टेरेन मॅपिंग कॅमेराच्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावरील जवळपास 4375 किमी उंचीवरुन फोटो काढले आहेत. इस्त्रोच्या मते या फोटोंमध्ये जॅक्सन, मच, कोरोलेव आणि मित्रा स्थानक या फोटोमध्ये दिसत आहेत.


या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे की, चांद्रयान सध्या चंद्राच्या अत्यंत जवळ आहे आणि यावर चंद्राची कल्पना केली जात आहे. जसजसे चांद्रयान 2 पुढे पुढे जाईल तसतसे भारताची मोहिम जगाला चंद्रसंबंधित रहस्य उलगडून दाखवेल.

यावेळी देखील चांद्रयान – 2 ने चंद्र आणि पृथ्वी दोघांमधील काही फोटो पाठवले आहेत. सर्वात आधी चांद्रयान-2 ने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पृथ्वीचा पहिला फोटो पाठवला होता. 21 ऑगस्टला चांद्रयान – 2 ने चंद्राच्या दुसऱ्या कक्षेत यशस्वीपूर्ण प्रवेश केला. 28 ऑगस्टला चांद्रयाना – 2 चंद्राच्या कक्षेत सोडण्यात आले होते. यानंतर चांद्रयान – 2 ने चंद्राच्या चारही बाजूंना 178 किमीचे एपोजी आणि 1411 किमी पेरीजी चक्कर मारल्या आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –