देशाचे पहिले CDS बिपीन रावत यांच्या ‘गणवेशा’चे फोटो ‘जारी’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सेना प्रमुख जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (सीडीएस) नियुक्त केले गेले. ते बुधवारी सीडीएस पदाचा कार्यभार स्वीकारतीलयुनिफॉर्म . सीडीएस म्हणून ते 31 डिसेंबरपासून कार्यकाल सुरु करतील आणि पुढील आदेशापर्यंत या पदावर कायम राहतील. सीडीएससंबंधित अनेक लोकांच्या मनात प्रश्न आहेत की त्यांचा युनिफॉर्म कसा असणार.

जनरल रावत यांच्या कारवर सीडीएसचा झेंडा लावलेला असेल आणि खांद्यावर बॅच असेल. भारतीय सैन्याने सीडीएस संबंधित वर्दी कशी असणार याचा फोटो शेअर केला आहे.

सीडीएसची भूमिका –
1) सीडीएस तीन्ही सैन्य दलात ताळमेळ राखतील तसेच सैन्याच्या प्रकरणासाठी विभागाची स्थापना
करतील. चीफ ऑफ डिफेंस स्टाफ याचे प्रमुख असतील. सीडीएस चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे स्थायी अध्यक्षांची असेल ज्यात सीडीएसची भूमिका सशस्त्र सैन्याच्या ऑपरेशनमध्ये अंतर्गत समन्वय आणि त्यासाठी वित्त प्रबंधन होईल. सीडीएस तिन्ही सेना दलाशी संबंधित मुद्यावर संरक्षण मंत्री प्रिंसिपल मिलिट्री अ‍ॅडवायजरी देखील असतील.

2) सीडीएस सेनेच्या तिन्ही दलाच्या प्रमुखांप्रमाणेच चार स्टार वाले ऑफिसर असतील. परंतु प्रोटोकॉलमध्ये पुढे असतीस. त्यांचे वेतन तिन्ही सेना दलाच्या प्रमुखांच्या समान असेल.

3) ते सरकारला संरक्षण प्रकरणात सल्ला देणारे मोठे अधिकारी असतील.

4) सीडीएस 65 वर्षाच्या वयापर्यंत सेवेत राहतील. सीडीएसच्या कार्यकाळासंबंधित स्थिती स्पष्ट करण्यात आली नाही. भूदल, वायू दल, नौदल प्रमुखांच्या सेवानिवृत्तीकाळात बदल करण्यात आला नाही.

5) सीडीएसच्या अध्यक्षतेत सैन्य प्रकरणात विभाग तिन्ही सेना दलाबरोबर संरक्षण मंत्रालय एकीकृत मुख्यालयाच्या प्रकरणात दिसतील. ज्यात सेना मुख्यालय, नौदल मुख्यालय, वायू दल मुख्यालय आणि संरक्षण स्टाफ मुख्यालय सहभागी असेल.

6) ते प्रादेशिक सेना, सेना, नौदल आणि वायू दलाचे कामकाज, खरेदी सोडून सध्याचे नियम तसेच प्रक्रियेअंतर्गत तीन सेनेच्या खरेदी प्रकरणात देखील लक्ष देईल.

7) तिन्ही सैन्य दलाच्या प्रकरणात सीडीएस संरक्षण मंत्र्यांच्या प्रधान सैन्य सल्लागार देखील असतील. तीन सैन्याचे प्रमुख आपल्या सैन्याबरोबर संरक्षण मंत्र्यांना पहिल्या सारखेच सल्ला देतील.

8) सीडीएस तीन सेनाच्या प्रमुखांसह कोणालाही कोणत्याही सैन्य कमान देणार नाही, त्यामुळे ते राजकीय नेतृत्वात निष्पक्ष सल्ला देऊ शकतील.

9) सीडीएस या पदावर राहून दुसऱ्या कोणत्याही सरकारी पदावर राहू शकणार नाही.

पंतप्रधान मोदींनी मागील वर्षी 15 ऑगस्टला लाल किल्यावरुन घोषणा केली की तीन सैन्य दलांमध्ये समन्वय बनवण्यासाठी सीडीएसचे पद तयार करण्यात येईल. 1999 मध्ये कारगिल युद्धानंतर जेव्हा 2001 मध्ये तत्कालील उपपंतप्रधान लाल कृष्ण आडवाणींच्या अध्यक्षतेत गठित ग्रुप ऑफ मिनिस्टर्सने समीक्षा केली तर तीन सैन्याच्या दरम्यान समन्वयाची कमी राहिलं, जर तिन्ही सैन्यामध्ये योग्य समतोल असता तर नुकसान कमी झाले असते. त्यावेळी देखील CDS चा बनवण्याची सूचना दिली होती परंतु राजकीय सहमती नसल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/