माणसामध्ये देखील डुक्कराचे ‘हृदय’ लावलं जाऊ शकतं, लंडनमधील सुप्रिसध्द डॉक्टरचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ब्रिटनमधील एका डॉक्टरने दावा केला आहे कि, पुढील 3 वर्षात डुक्करांचे हृदय मानवाच्या शरीरात बसविण्यात येऊ शकतात. मात्र याआधी डुक्करांच्या किडनीला मानवी शरीरात ट्रान्सप्लांट करण्याची प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर टेरेन्स इंग्लिश या ब्रिटनमधील प्रसिद्ध डॉक्टरांनी हा दावा केला असून त्यांनी चाळीस वर्षांपूर्वी पहिली हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली होती.

त्यांनी या विषयावर अधिक बोलताना सांगितले कि, त्यांचे सहकारी डॉक्टर मित्र यावर्षी अखेरपर्यंत डुक्करांच्या किडनीला मानवाच्या शरीरामध्ये ट्रान्सप्लांट करण्याची शस्त्रक्रिया करणार आहे. जगभरातून मोठ्या प्रमाणात अवयव प्रत्यारोपणाची मागणी होत असून एकट्या ब्रिटनमध्ये 280 नागरिक याची वाट पाहत आहेत. याआधी देखील जनावरांचे अवयव मानवाच्या शरीरामध्ये लावण्यात आले आहेत. त्यामुळे हि फार काही अवघड गोष्ट असणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. डुक्करांचेच अवयव का यावर बोलताना त्यांनी म्हटले कि, त्यांचे अवयव मानवी अवयवांप्रमाणेच असतात. त्यांचा आकार देखील समान असतो. त्यामुळे प्राणी संघटना वाले याला विरोध करणारच मात्र जर यामुळे माणसांचे प्राण वाचणार असतील काही वाईट नाही.

दरम्यान, सध्या जगभरातून अवयवांची मोठ्या प्रमाणात मागणी केली जात असल्याने या संशोधनाने मोठ्या प्रमाणात मदत मिळणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त-