पिंपळगाव नजीक येथे घडलेल्या खून प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षेची भाजपची मागणी

लासलगाव : लासलगाव जवळील पिंपळगाव नजीक येथे १६ जून रोजी झालेल्या घटनेत चेतन बाळू बैरागी या तरूणाची हत्या करण्यात आली.या घटनेची सखोल चौकशी करून या हत्येतील सर्व आरोपींना कठोर शिक्षा करण्यात यावी अश्या मागणीचे निवेदन लासलगाव शहर भाजपच्या वतीने लासलगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले

निवेदनात म्हटले आहे की लासलगाव शहरातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे.या अगोदर सुद्धा असे अनेक प्रकार घडले आहेत व दहशत निर्माण करण्यासारखे प्रयत्न केले गेले आहे.या सर्व प्रकारांमुळे शहरातील गुंडगिरी परिसरात वाढत आहे.पोलीस प्रशासनाने शहरात गस्त वाढवून पोलिसांचा दबदबा निर्माण करावा व या घटनेतील आरोपींना कडक शासन होईल अशा पद्धतीने कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .

या वेळी भाजपाचे शहराध्यक्ष योगेश पाटील,प्रकाश दायमा,राजेंद्र चापेकर,संतोष पलोड,भाजपच्या जिल्हा मीडिया प्रवक्त्या सुवर्णा जगताप,स्मिता कुलकर्णी,राजू राणा,रवींद्र होळकर,ज्ञानेश्वर इंगळे,मुकुंद भावसार,चिराग जोशी,कपिल लचके,अरुण भांबारे,मयूर झांबरे,बळीराम काळे,किशोर जाधव,सचिन लचके,अमित भावसार,श्वेता लचके आदींसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते