पिंपरी-चिंचवडमध्ये उच्चशिक्षित महिलेसह 3 जणांनी आयुष्य संपवलं

पोलीसनामा ऑनलाइन – एकाच दिवशी तीन जणांनी आत्महत्या केल्याने पिंपरी चिंचवड परिसर हादरुन गेला आहे. वाकड परिसरातील एका आय. टी. आभियंत्यासह एकूण तीन जणांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आय. टी. अभियंता असलेल्या प्रशांत सेठने राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली तर तनिका शर्मा या उच्चशिक्षित महिलेने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारुन आपली जीवन यात्रा संपवली. तिसऱ्या घटनेमध्ये गेनदेव काशीद यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. या तीनही घडलेल्या घटनांचा पुढील तपास वाकड पोलिस करत आहेत.

तसेच वाकड पोलिसांच्या सतर्कतेमुळे काल आणखी एका व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखण्यात पोलिसांना यश आलं. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथे आणखी एक जण आत्महत्या करत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वाकडचे गस्तीवरील पोलिस तात्काळ घटनास्थळावर उपस्थित झाले. त्यांनी आत्महत्येच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीला ताब्यात घेतले असता तीन महिन्यापासून बायको मुलं माहेरी गेल्यामुळे आपण हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं.

पुण्यात कुटुंबाने केली आत्महत्या

वाघजाईनगर परिसरातील एकाच कुटुंबातील चार जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. अतुल दत्तात्रय शिंदे यांनी आपल्या पत्नी आणि दोन चिमुकल्यासह राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवलं आहे. या प्रकरणी घरात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यात पोलिसांनी या प्रकरणी कोणालाही जबाबदार धरू नये. आम्ही आमच्या मर्जिन आत्महत्या करत आहोत असं पेन्सिलने भिंतीवर लिहलेली सुसाईड नोट घटनस्थळावर मिळाली आहे. दरम्यान, हा टोकाचा निर्णय घेण्यामागचं कारण आर्थिक विवंचना होत का याचा पुढील तपास पुणे पोलिस करत आहेत.

धायरीत व्यवसायिकाची आत्महत्या

सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका मंडप व्यवसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. स्वप्नील उत्तम रायकर (वय ४५) असं या व्यावसायिकाचे नाव असून, सदर प्रकार आज (शुक्रवारी) पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास समोर आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील यांचा मंडप डेकोरेटचा व्यवसाय असून, राहत्या घरी किचन रुम मध्ये छताच्या हुकला बेडशीटच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मानसिक ताण-तणावातून त्यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी सांगितली.