पिंपरी : विरोधी पक्षनेत्यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्या चिखली येथील कार्यालयाची तिघा – चौघांनी तोडफोड केली. ही घटना आज (शुक्रवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली.

Datta-Sane office

चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी सोनटक्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचे चिखली, मोरेवस्ती येथे जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात आज दुपारी चारच्या सुमारास अज्ञात तीन चार तरुण आले. त्यांनी काही एक न विचारपूस करता थेट केबिनची काच आणि टेबल वरील काच फोडली.

Datta-Sane

या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून तपास सुरु आहे. आरोपींची अद्याप ओळख पटली नाही. चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.