चाकणमध्ये ६ लाखांच्या गांजासह एकाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला म्हाळुंगे पोलीस चौकी आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाई करत अटक केली. त्याच्याकडून ६ लाख ४५ हजार रुपये किंमतीचा ४३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. हि कारवाई चाकण-तळेगाव रोडवर करण्यात आली. सुरेश मारूती पवार (वय-५२ रा. धानोरा, ता. जामखेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

तळेगाव-चाकण रोडवरील महाराष्ट्र वजन काट्याजवळ एकजण गांजाची तस्करी करण्यासाठी आला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करुन आरोपीला अटक केली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोफळे, सहायक पोलीस आयुक्त आर.आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली म्हाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, सहायक पोलीस निरीक्षक क्षिरसागर, पोलीस उपनिरीक्षक वसंत मुळे, दळवी, भदाणे, पोलीस कर्मचारी राजेंद्र बांबळे, राजन महाडीक, गोसावी, संतोष दिघे, बोराटे, महिला पोलीस नाईक जाधव, वडेकर, भोसुरे, शैलेश मगर, दादा धस, प्रसाद कलाटे, प्रदिप गुट्टे यांच्या पथकाने केली.

जाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे

सावधान ! ‘पेरॉसिटोमॉल’च्या ज्यादा सेवनाने ‘लिव्हर’ला धोका, ‘ही’ आहेत कारणे

‘हे’ 3 फायबर फूड कंट्रोल करतात ‘हाय ब्लड प्रेशर’ ; कमी होतो हार्ट अटॅकचा ‘धोका’

वजन कमी करायचंय तर ‘ही’ कॉफी डाएट नक्की करा

मेनोपॉज मध्ये स्वस्थ राहण्यासाठीचे ‘हे’ ६ उपाय

मासिक पाळी नियमीत वेळेवर येण्यासाठी ‘हे’ घरगुती उपाय, लवकर आणण्यासाठी ‘हे’ करा

‘ब्रेस्ट’ साइज कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय करा !

गर्भावस्थेत कोणत्या मसाल्यांचं सेवन करावं अन् कोणत्या नाही, जाणून घ्या

गर्भ राहण्यासाठी करा ‘हे’ ३ घरगुती उपाय

दररोज करा ‘या’ हेल्दी रुटीनला फॉलो अन् रहा निरोगी

मासिक पाळीमध्ये ‘सेक्स’ करणे सुरक्षित आहे का ? जाणून घ्या फायदे व नुकसान

 

Loading...
You might also like