फारच त्रासदायक असतात ओठांवरील पिंपल्स ! जाणून घ्या ‘हे’ 6 सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  1) मेकअप काढा – तुम्ही किती थकलेल्या असाल तरीही मेकअप काढायला विसरू नका. झोपण्यापूर्वी लिपस्टिक, आयलायनर, काजळ, टिकली चेहऱ्यावरून काढून टाका. मेकअप न काढताच जर झोपी जात असाल तर असं करू नका. कारण यामुळं त्वचेला ऑक्सिजन मिळणार नाही आणि त्वचा निस्तेज दिसेल. पिंपल्सच्या आणखी समस्या येऊ शकतात.

2) चेहऱ्याची स्वच्छता – चेहऱ्याची स्वच्छता घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. दिवसातून दोन वेळा ताज्या पाण्यानं कमीत कमी 2 वेळा आपला चेहरा स्वच्छ करा. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यासाठी माईल्ड फेसवॉशचा वापर करा आणि चेहरा धुवून घ्या. स्किन टाईपनुसार नाईट क्रिमचा वापर करा.

3) नॅचरल प्रॉडक्ट – केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यानं स्किनवर अनेक घातक परिणाम होतात. म्हणून नॅचरल प्रॉडक्ट किंवा घरगुती उपयांवर भर द्या. शक्य असेल तर कॉटन गुलाब पाण्यात बुडवून चेहरा पुन्हा स्वच्छ करा.

4) काही सवयी बदला – आपल्याला अनेक सवयी असतात. जसं की, सतत चेहरा किंवा ओठांना हात लावणं. काम करताना आपण अनेक वस्तूंना स्पर्श करतो. अशात तुम्ही चेहऱ्याला किंवा ओठांना हात लावला तर इंफेक्शन किंवा पिंपल्स येऊ शकतात.

5) जेवल्यानंतर आणि झोपण्यापूर्वी ब्रश करा – यामुळं तोंडासोबतच दात आणि ओठांचीही स्वच्छता होते. स्किन जास्त सेंसिटीव असेल तर आयुर्वेदीक टूथ पेस्टचा वापर करा.

6) अप्पर लिप्स थ्रेडिंग किंवा व्हॅक्सिंग – तुम्ही अप्पर लिप्स थ्रेडिंग किंवा व्हॅक्सिंग करत असाल तर पार्लर हायजिनची काळजी घ्या. तुमचा चेहरा आणि वापरण्यात येणारं प्रॉडक्ट दोन्ही स्वच्छ असेल याकडे लक्ष द्या. लिप व्हॅक्स किंवा अप्पर लिप्स करण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून लोशन नक्की लावा. हे केल्यानंतर ऑईनमेंट लावा. यामुळं ओपन झालेल्या पोर्समध्ये बॅक्टेरियल इंफेक्शन होणार नाही.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.