तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मुलीचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपळे गुरव परिसरात राहत्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्याच्या बाल्कनीतून पडल्याने पाचवीत शिकणाऱ्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. 13) पहाटेच्या सुमारास घडली.

गौरी राऊत (11, रा. पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी एक वाटसरू गौरी राहत असलेल्या इमारतीच्या खालून रस्त्याने जात होता. तेव्हा त्याला गौरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. त्यानंतर तो व्यक्ती इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर गेला आणि त्याने गौरीच्या घराचा दरवाजा ठोठावला. घरातील व्यक्तींना झोपेतून उठवून त्या वाटसरूने घटनेची माहिती दिली. त्यानंतर तातडीने कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात उपचार करण्यापूर्वी गौरीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला होता.

गौरीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. तिच्यावर उपचार सुरू होते. या नैराश्यातूनच तिने आत्महत्येचा प्रयत्न केला असावा, असा पोलिसांना संशय आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/