पिंपरी : वाहनचोरी विरोधी पथकाकडून चोरीच्या 19 दुचाकी जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – चाकण परिसरात पेट्रोलिंग करत असताना एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 19 दुचाकी जप्त केल्या असल्याची माहिती पत्रकार परिषदेत सहाय्यक पोलिस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.

विशाल उत्तम मेटांगळे (21, रा. दावडमळा, चाकण) याला अटक केली आहे. उमाकांत सालुंके, मनोज वाघमारे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाहनचोरी विरोधी पथकाचे अधिकारी, कमर्चारी पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी एक वाहन चोर येणार असल्याची माहिती कर्मचारी सचिन उगले यांना मिळाली. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप बिष्नोई, सह आयुक्त प्रकाश मुत्याल, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील, श्रीधर जाधव, वरिष्ठ निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक सतीश कांबळे, उपनिरीक्षक गिरीष चामले, कर्मचारी विवेकानंद सपकाळे, हजरत पठाण, दादा पवार, रमेश गायकवाड़, विनोद सालवी, सचिन उगले, अरूण नरळे व युनिट तिनच्या पथकाने सापळा रचला.

या पथकाने विशालला ताब्यात घेऊन चौकशी केली. तो आणि इतर दोघांकडून पाच लाख 70 हजार रूपये किमतीच्या 19 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तळेगाव, चिखली, चाकण, भोसरी, खेड, पिंपरी पोलिस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.

Visit : Policenama.com