भोसरीत 2 बोगस डॉक्टरांचा ‘पर्दाफाश’

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे-नाशिक रस्त्यावर भोसरी येथे सफलता आयुर्वेदिक दवाखाना सुरु करून, रुग्णांना बनावट प्रमाणपत्र दाखवून, फसवणूक करणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे.

डॉ. अहमद इम्तियाज शेख (३२, रा. भोसरी, मूळ-मुंब्रा, ठाणे) आणि डॉ. नामे मोनी मोहन सुधीर सिन्हा (५५, रा. भोसरी, मूळ-पश्चिम बंगाल) या दोघांना अटक केली आहे. या प्रकरणी अभय चंद्रकांत पवार (४७, रा. बेलापूर, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे-नाशिक रस्त्यावर भोसरी येथे महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकान शेजारी हे दोन डॉक्टर सफलता आयुर्वेदिक नावाने दवाखाना चालवत होते.

रुग्णांची शारीरिक कमजोरता लक्षात घेऊन आणि बनावट प्रमाणपत्र दाखवून या दोघांचा हा धंदा सुरू होता. पवार यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भोसरी पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर पोलिसांज कारवाई केली आहे. तपास भोसरी पोलीस करत आहेत.