वाहतूक नियमांची पायमल्ली करणार्‍या 3 हजार 436 चालकांवर खटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कडक कारवाई सुरु केली आहे. दोन आठवड्यात ड्रंक अँड ड्राइव्ह, राॅंग साईड, ओव्हर स्पीड, टेन्टेड ग्लास या चार प्रकारांमध्ये 3 हजार 436 खटले दाखल करून त्यामध्ये 10 लाख 31 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून 1 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालवणे (ड्रंक अँड ड्राइव्ह), विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (राॅंग साईड), वेग मर्यादेपेक्षा जास्त वेगात वाहन चालवणे (ओव्हर स्पीड), वाहनांना काळ्या काचा लावणे (टेंटेड ग्लास) या चार प्रकारांवर विशेष भर देण्यात आला.

ड्रंक अँड ड्राइव्ह करणाऱ्या 195 वाहन चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. ही सर्व प्रकरणे न्यायालयात सादर करण्यात आली आहेत. राॅंग साईडने वाहन चालवणाऱ्या 1 हजार 358 वाहनचालकांवर कारवाई करत त्यांच्यावर 1 लाख 35 हजार 800 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ओव्हर स्पीडने वाहन चालवणाऱ्या 642 जणांना 6 लाख 47 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. वाहनांना काळ्या काचा लावलेल्या 1 हजार 241 वाहनांवर कारवाई करून तात्काळ काळ्या काचांचे फिल्मिंग काढण्यात आले. तसेच त्या वाहन चालकांना 2 लाख 48 हजार 200 रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like