पिंपरीतील थेरगावमधील खून प्रकरणाचा ‘पर्दाफाश’, चौघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड मधील थेरगाव परिसरात झालेल्या खूनाचा उलगडा झाला आहे. पूर्वी झालेल्या भांडणातून खून केल्याचे स्पष्ट झाले असून वाकड पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
ऋषभ गायकवाड असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुख्य आरोपी गुड्डया उर्फ किशोर ज्ञानदेव शेलार, सीजीन फिलीप जॉर्ज, रोहित सिंग, सचिन साठे असे खुनाच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या आरोपींची नावे असून त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी प्रमोद किसन गायकवाड याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ गायकवाड आणि सीजीन फिलीप जॉर्ज याचा वर्षाभरापूर्वी वाद झालेला होता. तेव्हा पोलिसात प्रकरण न जाता त्यांनी एकमेकांना सॉरी म्हणून प्रकरण मिटवल होतं. परंतु, सीजीन फिलीप जॉर्जच्या मनात याबद्दल राग होताच. तेव्हाच, आरोपी गुड्ड्या उर्फ किशोर ज्ञानदेव शेलारला एका गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली होती. त्याची जामिनावर सुटका जॉर्ज याने केली. तेव्हा पासून दोघांची मैत्री झाली होती.

दरम्यान, जॉर्जने ऋषभ बद्दल झालेली घटना सांगितली. त्यानंतर गुड्ड्या आणि जॉर्ज या दोघांनी ऋषभला ठार मारण्याचा कट रचला. त्याप्रमाणे यासाठी इतरांची मदत घेतली गेली. शुक्रवारी ऋषभला बोलावून घेऊन त्याच्यावर कोयत्याने वार आणि दगडाने ठेचून त्याला ठार केले गेले. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. वरिष्ठ निरीक्षक विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर यांच्या पथकाने तपास करत आरोपींना अटक केली आहे.