Coronavirus : चिंताजनक ! पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 41 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाच्या रुग्णात वाढ होत आहे. आज रविवारी 41 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील रुग्णांची संख्या 354 वर पोहोचली असून ही आकडेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंतची आहे. अचानकपणे वाढलेल्या रुग्णांमुळे शहरात हाहाकार उडाला आहे तर सर्वसामान्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शनिवारी 377 संशयीतांचे अहवाल प्रतिक्षेत होते. त्यापैकी काहीजणांचे अहवाल सकाळी साडे अकरा वाजता आले. तर काहीजणांचे अहवाल दुपारी साडेपाच वाजता आले. सकाळी आलेल्या अहवालामध्ये चार जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामध्ये भोसरीतील एका पुरुषाचा समावेश होता. तर वारजे आणि जुन्नर येथील एका पुरुषाचा व दोन महिलांचा समावेश होता.

दुपारी साडेपाच वाजता आलेल्या अहवालानुसार तब्बल 41 जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. शहरातील आनंदनगर (चिंचवड), सांगवी व थेरगाव येथील आहेत. यामध्ये 30 पुरुष आणि 11 महिलांचा समावेश आहे.