विनयभंगाचा जाब विचारला म्हणून माय लेकींना मारहाण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – विनयभंग केल्याचा जाब विचारला म्हणून पीडित मुलगी आणि तिच्या आईला पाच जणांनी मारहाण केली. ही घटना 5 नोव्हेंबर 2019 ते 16 जानेवारी 2020 या कालावधीत मेदनकरवाडी येथे घडली.

राहुल धर्मा भालेकर (18), योगेश प्रकाश वतंबे (18) या दोघांना अटक केली आहे. तर अर्जुन लक्ष्मण येरकर, सविता लक्ष्मण येरकर, राधाबाई भालेकर (सर्व रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या 32 वर्षीय आईने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी फिर्यादी महिलेची पीडित अल्पवयीन मुलगी शाळेला जाता-येता  तिचा पाठलाग केला. तिला अश्लील बोलून तिच्याशी अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. याबाबत फिर्यादी महिला आरोपींकडे विचारणा करण्यासाठी गेल्या असता सर्व आरोपींनी त्यांना व त्यांच्या पीडित मुलीला शिवीगाळ करून मारहाण केली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like