पिंपरी : बेपत्ता सात वर्षाच्या मुलीचा खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर हादरले आहे. पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या सात वर्षाच्या लहान मुलीचा खून झाला असून मृतदेह पिंपरी येथील एचए मैदानावर गुरुवारी सकाळी सापडला आहे. मुलीवर अत्याचार केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

धनश्री पुणेकर (७, रा. रमाबाईनगर, पिंपरी) या मुलीचा खून झाला आहे. धनश्री ही सोमवारी सायंकाळी घरासमोर खेळत होती. खेळत असताना अचानक ती सायंकाळी पाचच्या सुमारास बेपत्ता झाली. पालकांनी तिचा शोध नातेवाईक व परिसरात घेतला, मात्र ती आढळून आली नाही. त्यामुळे पिंपरी पोलिसांकडे बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1b45b971-c226-11e8-baf4-85c4f42d0ac5′]

पिंपरी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतला आणि शोध घेतला. मात्र मुलगी त्यांना सापडली नाही. दोन दिवसात पोलिसांना बेपत्ता मुलीचा शोध घेता आला नाही. आज गुरुवारी सकाळी एचए मैदानावर एका मुलीचा मृतदेह पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी पाहणी केली असता ती बेपत्ता झालेल्या धनश्रीचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. धनश्री हिचा खून झाला असून तिच्यावर अत्याचार झाले असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पोलीस घटनास्थळी असून तपास सुरू केला आहे.

[amazon_link asins=’B01DEWVZ2C,B01J82IYLW’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1276a047-c226-11e8-8364-179ee88cc215′]
जनता वसाहत जवळचा मुळा कालवा फुटला ; गाड्यांचे नुकसान