Pune : 71 वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार करुन खुन; चाकणमधील धक्कादायक घटना, 53 वर्षाच्या नराधमाला अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – ७१ वर्षाच्या वृद्धेवर बलात्कार करुन तिला मारहाण करुन तिचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

चाकण पोलिसांनी अनिल सुदाम वाघमारे (वय ५३, रा. कुरकुंडी, ता. खेड) या नराधमाला अटक केली आहे. ही घटना खेड तालुक्यातील कुरकुंडी गावात २३ मे रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी या महिलेच्या सुनेने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ७१ वर्षाची ही महिला घरात असताना अनिल वाघमारे हा तिच्या घरी गेला. तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर त्याने लोखंडी फुकणीने कपाळावर व डाव्या गालावर मारहाण करुन तिचा खुन केला आहे. पोलिसांनी संशयावरुन अनिल वाघमारे याला अटक केली आहे.