Pimpri : 8 वी तील मुलीला झूम अ‍ॅपवर अश्लील मेसेज, आत्महत्येस केलं जातंय प्रवृत्त

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या काळात शाळा बंद असल्याने मुलांना ऑनलाईन शिक्षण (Online Education) देण्यात येत आहे. मात्र यातून काही अनुचित प्रकार घडत असल्याचे समोर आले आहे. भोसरी (Bhosari) येथील एका आठवीत शिकणाऱ्या मुलीला झुम अ‍ॅपवर (Zoom App) अश्लील मेसेज (pornographic Message) आले असून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून हा प्रकार वारंवार होत असल्याने याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, मुलीसंबंधी तिचे वडील आणि मुख्याध्यापकांच्या मेलवर देखील अश्लील मेसेज आले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरनामुळे शाळांकडून मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. आठवीत शिकणाऱ्या मुलीला अश्लील मसेज आला असून तिला जीवे मारण्याची धमकी झूम अ‍ॅपवर देण्यात आली आहे. तसेच तिला आत्महत्येस प्रवृत्त केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा गंभीर प्रकार 15 जून ते 12 डिसेंबर 2020 या कालावधीत घडला आहे. आरोपीने माझा माणूस तुझ्याकडे पाठवतो, तू जर आली नाहीस तर जीवे मारेल, अन्यथा तू आत्महत्या कर असे झूम अ‍ॅपवर मेसेज आरोपीने पीडित मुलीला केले आहेत. गंभीर बाब म्हणजे अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या आणि ज्या शाळेत मुलगी शिक्षण घेत आहे तेथील मुख्याध्यापक यांच्या मेलवर देखील मुलीसंबंधी अश्लील मेसेज आल्याचे समोर आलं आहे. याप्रकरणी शाळा प्रशासनाने सर्व पालकांची आणि मुलांची बैठक घेऊन असं कोणा संबंधी घडल्यास तात्काळ याची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारे करत आहेत.