पिंपरी : 16 वर्षाच्या मतीमंद मुलीवर बलात्कार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – १६ वर्षाच्या मतीमंद मुलीला आमिष दाखवून तिला आपल्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी दीपक लक्ष्मण शिनगारे (वय २३, रा. जय महाराष्ट्र चौक, भोसरी) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी ४ मे रोजी सायंकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान घडली.

याप्रकरणी एका ३५ वर्षाच्या महिलेने गुन्हा दाखल केला आहे. ही महिला व तिचे पती घरात असताना दीपक शिनगारे याने त्यांची १६ वर्षाची मुलगी हिला कशाचे तरी आमिष दाखवून तिला बाहेर नेले. एका इमारतीत नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. ही घटना समजात तिच्या आईवडिलांनी भोसरी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी दीपक शिनगारे याला अटक केली आहे.