पिंपरी : थम इम्प्रेशन घेण्यासाठी 7 वर्षाच्या मुलीला मांडीवर बसवलं; दाखविला अश्लिल व्हिडिओ, FIR दाखल

पिंपरी : आधार कार्ड काढण्यासाठी मोबाईल शॉपीमध्ये गेलेल्या सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या दुकानदारावर चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पवन सुरेश कोळपकर (रा. मुटकेवाडी, चाकण) असे या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने चाकण पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आपल्या ७ वर्षाच्या मुलीचे आधारकार्ड काढण्यासाठी तिला घेऊन चाकणमधील वेदांत संकुल येथील राज मोबाईल शॉपीमध्ये ११ मे रोजी दुपारी २ वाजता गेल्या होत्या. यावेळी तेथे असलेल्या पवन कोळपकर याने या मुलीचा थम इंम्पे्रशन घेण्याचा बहाणा करुन तिला आपल्या मांडीवर बसविले. त्यानंतर समोर असलेल्या कॉम्प्युटरवर अश्लिल व्हिडिओ दाखवून तिच्या पँटमध्ये हात घातला. चाकण पोलिसांनी पवन कोळपकर याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.