पिंपरी : काळेवाडीत घरमालकवर दरोड्याचा गुन्हा

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – विजयनगर, काळेवाडी येथे घरमालकाने भाडेकरूच्या मुलास मारहाण करून घरातील साहित्य जबरदस्तीने नेले. याप्रकरणी घरमालक आणि त्याच्या साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संपा पियुष गांगुली (52, रा. काळे बिल्डींग, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तर घरमालक शांताराम काळे, त्याची पत्नी, मुलगा व इतर आठ ते दहा जण (पुर्ण नाव पत्ता समजू शकला नाही) यांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. शांताराम काळे यांच्या खोलीत संपा गांगुली या भाडेकरू आहेत. गेल्या दहा वर्षांपासून त्यांच्यात खोली खाली करण्यावरून वाद सुरू आहे. सोमवारी सकाळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास काळे संपा यांच्या खोलीत आले.

त्यांनी संपा यांच्या मुलास हाताने मारहाण करीत खोलीतील घरसामान जबरदस्तीने घेऊन गेले. तसेच मुलाच्या कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्या, असे फिर्यादीत म्हटले आहे. तपास वाकड पोलीस करीत आहेत.

Visit :  Policenama.com