पिंपरी : क्राईम ब्रॅचचे पोलीस असल्याचे सांगून ज्येष्ठ महिलेला लुटले

पिंपरी : पायी घरी जात असलेल्या महिलेला थांबावून क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून अंगावरील दागिने काढून घेऊन तिघा तोतया पोलिसांनी १ लाख ६० हजार रुपयांची फसवणूक केली.

ही घटना थेरगाव येथील सध्रुव कॉम्प्लेक्स येथे सकाळी साडेदहा वाजता घडली. याप्रकरणी ७३ वर्षांच्या महिलेने वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. फिर्यादी या पायी घरी जात होत्या. थेरगावमधील प्रसुनधाम रोडवरील सध्रुव कॉम्प्लेक्स समोरुन जात असताना एक जण त्यांच्याजवळ आला. त्यांना तुम्हाला आमच्या साहेबांनी बोलावले आहे, असे सांगून त्यांना दुसयाकडे घेऊन गेला़ दुसर्‍या चोरट्याने त्यांना आम्ही क्राईम ब्रँचचे पोलीस आहे. आम्हाला संरक्षणाकरीता नेमलेले आहे. गळ्यातील दागिने काढून ठेवा, असे सांगितले. त्याप्रमाणे त्या गळ्यातील दागिने काढत असताना ते केसात अडकल्याने दुसर्‍या चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हातात घेऊन पर्समध्ये टाकल्याचा बनाव केला. व ते दुचाकीवरुन पळून गेले. त्यांना शंका आल्याने त्यांनी पर्स उघडून पाहिले असता त्यात ४० ग्रॅम वजनाची १ लााख ६० हजार रुपयांची दोन पदराची सोन्याची माळ दिसून आली नाही. चोरट्यांनी हातचलाखीने दागिने चोरुन नेले.