Pimpri : अंथुरुणात शिरून चाळे करून तरुणीचा विनयभंग

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – झोपलेल्या तरुणीच्या अंथुरुणात शिरून तुझा स्टॅमिना किती आहे. तुझ्या बॉयफ्रेंडला कशी सुख देते, असे विचारून अश्लील चाळे करणार्‍या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली आहे.

वैभव भालचंद गोडसे (वय २२, रा. गणेशनगर, तळवडे रोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी व आरोपी तरुण हे एकमेकांचे मित्र आहेत. फिर्यादी या शनिवारी दुपारी झोपलेल्या असताना आरोपी वैभव गोडसे हा तिच्या अंथुरुणात शिरला. तिच्या अंगावरून हात फिरवत तो फिर्यादीला तुझा स्टॅमिना किती आहे. तुझ्या बॉयफ्रेंडला कशी सुख देते, तसे मला खूश ठेव, असे म्हणून त्याने विनयभंग केला. चिखली पोलिसांनी आरोपीला अटक् केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक न्यामणे अधिक तपास करीत आहेत.

You might also like