Pimpri Accident News | पिंपरी : स्पिड ब्रेकरवर गाडी घसरुन पडल्याने 53 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Accident News | भरधाव वेगात जात असताना स्पीड ब्रेकरवर गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरली. यामध्ये गंभीर दुखापत होऊन एका 53 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात बुधवारी (दि.10) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास आंबेठाण गावच्या (Ambethan Pune) हद्दीतील मराठी शाळे समोर असलेल्या गतिरोधकावर झाला.

दिलीप गेणुभाऊ कदम (वय-53 रा. वासुली फाटा, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी कदम यांच्यावर आयपीसी 279, 304(अ) 337, 338 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मयत कदम यांचा पुतण्या ऋषिकेश शिवाजी बोंबले (वय-24 रा. चांडोली ता. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Mahalunge MIDC Police Station) फिर्य़ाद दिली आहे.(Pimpri Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे काका दिलीप कदम हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 बीई 9713)
भरधाव वेगात जात होते.
मराठी शाळे समोर गतीरोधकावर कदम यांचे गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी घसरून ते खाली पडले.
गाडी वेगात असल्याने त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात आले.
मात्र, त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jayant Patil On BJP | पवारसाहेब भाजपसोबत जाण्यास तयार नव्हते, हीच ‘त्या’ नेत्यांची अडचण होती, जयंत पाटलांचे प्रत्युत्तर

NMV School Pune | पुण्यातील नू.म.वि शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण, व्हायरल व्हिडीओ पाहून पुणेकर संतप्त; कारवाईची मागणी (Video)

Baramati Lok Sabha | सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी शरद पवारांचे बेरजेचे राजकारण, कट्टर प्रतिस्पर्धींच्या भेटी सुरुच! काकडे कुटुंबियांची घेतली भेट