Pimpri Accident News | पिंपरी : ओव्हरटेक करताना पिकअप वाहनाची दोन दुचाकींना धडक, एकाचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pimpri Accident News | ओव्हरटेक करत असताना भरधाव वेगातील पिकअप वाहनाची धडक दोन दुचाकींना बसली. यामध्ये एका दुचाकीवरील दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी (दि.1) दुपारी दीडच्या सुमारास शिक्रापूर-चाकण रोडवरील मेदनकरवाडी चौकातील चक्रेश्वर रोडकडे जाणाऱ्या वळणावर झाला आहे. याप्रकरणी चाकण पोलिसांनी पिकअप चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

विकी राजेंद्र वडतेरा (रा. संग्रामदुर्ग किल्ला, चाकण ता. खेड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. तर चैतन्य रमेश निंबाळकर (वय-23 रा. भुजबळ आळी, चाकण, ता. खेड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संघर्ष नामदेव गचे (वय-18 रा. भुजबळ आळी, चाकण, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. याप्रकरणी पिकअप चालक श्रीनाथ भारत पांचाळ (रा. मेदनकरवाडी, चाकण ता. खेड, जि. पुणे) याच्यावर आयपीसी 279, 304 (अ), 337, 338, 427 सह मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.(Pimpri Accident News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिक्रापुर चाकण रोडने त्याच्या ताब्यातील पिकअप (एमएच 12 एफ 9579)
भरधाव वेगात घेऊन जात होता. त्याचवेळी फिर्य़ादी त्यांच्या दुचाकीवरुन जात होते.
आरोपीने फिर्यादी यांच्या समोरील यामाहा दुचाकीला व चैतन्य यांच्या पुढील दुचाकीला ओव्हरटेक करुन चकेश्वर
रोडकडे वळण घेतले. मात्र, आरोपीचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने विकी वडतेरा याच्या यमाहा गाडीला धडक बसली. यामध्ये विकी रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर मार बसून मृत्यू झाला. तर चैतन्य निंबाळकर हा जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Siddharth Shirole | बोपोडी चौक वाहतूक आठवडाभरात मार्गी लागेल – आमदार सिद्धार्थ शिरोळे

Pulse Polio Vaccination | पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बालकांना पूर्वीचा डोस अवश्य द्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण

Maratha Protesters In Solapur | संतप्त मराठा आंदोलकांनी अजित पवार गटाच्या आमदारपुत्राला गावातून परत पाठवले