Pimpri : खुनातील आरोपींना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडून 8 तासात अटक

पिंपरी/पुणे : पोलसीनामा ऑनलाइन – पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाचा डोक्यात अवजड वस्तू मारुन खून केल्याची घटना गुरुवारी (दि.10) रात्री दहाच्या सुमारास घडली होती. ही घटना औंध रुग्णालयाच्या समोर घडली होती. या घटनेनंतर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. गुन्हे शाखेने अवघ्या आठ तासात गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.

शेखर मनोहर चंडाले (वय-27 रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अक्षय अशोक नाईक (वय-23 रा. सांगवी फाटा, औंध) आणि विक्रम उर्फ बिकू श्रीकेसरीन सिंग (वय-18 रा. बोपोडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत शेखर आणि आरोपी यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी किरकोळ करणावरुन भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास डोक्यात अवजड वस्तू मारुन खून केला. मयत शेखर हा औंध हॉस्पिटलच्या समोर थांबला असताना आरोपींनी त्याचा खून केला. खून केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखेचे पोलिसांनी समांतर तपास सुरु केला. आरोपी खून केल्यानंतर फोन बंद करुन पळून गेले होते. त्यांची माहिती घेण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या मित्रांकडे चौकशी केली. दरम्यान आरोपी आंबेडकर चौक, भाऊ पाटील रोड, बोपोडी येथे नाल्याच्या कडेला लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत पूर्वीच्या भांडणातून खून केल्याची कबुली आरोपींनी दिली. मयत शेखर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात मारामारीचा एक गुन्हा दाखल आहे. आरोपींना पुढील कारवाईसाठी सांगवी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे सुधीर हिरेमठ, सहायक पोलीस आयुक्त राजाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहायक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, पोलीस हवालदार प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, आदिनाथ मिसाळ, पोलीस नाईक संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो.गौस नदाफ, वासुदेव मुंडे, पोलीस शिपाई शावरसिद्ध पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टा, तुषार काळे, सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोविंद चव्हाण, अतुल लोखंडे, नागेश माळी, गुन्हे शाखेच्या तांत्रिक विश्लेषन विभागाचे राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केली.