बंदचा आदेश असताना देखील आस्थापना चालू ठेवणार्‍या 16 दुकानदारांवर कारवाई

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग करत आस्थापना सुरु ठेवणाऱ्या १६ दुकानदारांवर चिखली पोलिसांनी कारवाई करत खटले भरले आहेत. देशासह, राज्य आणि पुणे, पिंपरी चिंचवड शहरात करोना व्हायरसचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. हा व्हायरस आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. शहरात १४४ चे आदेश काढण्यात आले असून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या आस्थपणा वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

या आदेशाला केराची टोपली दाखवत चिखली परिसरात दुकाने सुरू होती. या दुकानावर चिखली पोलिसांनी १८८ प्रमाणे कायदेशीर कारवाई करुन खटले दाखल केले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिली आहे.