अण्णांचा रविवार सुट्टीचा ‘धमाका’ !

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेस मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी आज रविवार सुट्टीच्या दिवसाचे औचित्य साधत प्रचारात आघाडी घेतली. दुर्गादेवी टेकडी येथे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. दापोडी येथे फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन भव्य पदयात्रा काढली. तर पिंपरी कॅम्पात कामगार मेळावा घेतला. मतदारांमधून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे दिसले. ठिकठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. महिला भगिनींनी औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
Anna Bansode
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष व महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अण्णा दादू बनसोडे यांनी दुर्गादेवी टेकडी निगडी प्राधिकरण या ठिकाणी सकाळी मॉर्निंग वॉकचे निमित्त साधून नागरिकांशी संवाद साधला. ज्येष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या व प्रचार पत्रकांचे वाटपही केले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी नगरसेवक सुजित पाटील, संदीप चिंचवडे, निलेश पांढरकर, तसेच बाळासाहेब ठाणगे, निलेश शिंदे, दादा नाईक, प्रतीक इंगळे, चतुर पांढरकर, राजेंद्र गावडे, राजेंद्र सोनवणे, श्रीमंत जगताप, नितीन कदम, सचिन बनसोडे, राजू कोहली, रमेश कस्तुरे आदी उपस्थित होते.

दापोडी येथे अण्णा बनसोडे यांनी फिरंगाई देवीचे दर्शन घेऊन गावठाणात भव्य पदयात्रा काढली. या पदयात्रेस मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी ज्येष्ठ नगरसेविका माई काटे, नगरसेवक रोहितआप्पा काटे, शाम लांडे, राजू बनसोडे आदी उपस्थित होते.

पिंपरी कॅम्प येथे अण्णा बनसोडे यांच्या प्रचारासाठी कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बनसोडे म्हणाले की, नोटबंदी व जीएसटीमुळे अनेक उद्योग बंद पडले आहेत. काही उद्योग शेवटचा श्वास घेत आहेत. वाहन उद्योगावर मंदीचे सावट आहे. त्यामुळे या उद्योगांमध्ये नोकरी करत असलेला कामगार भयभीत झाला आहे. त्याला दिलासा देणे गरजेचे आहे. राज्यात राष्ट्रवादी – कॉंग्रेस आघाडीचे सरकार आल्यानंतर हे उद्योग जगावेत यासाठी धोरण निश्चित केले जाईल. त्यासाठी एक एक आमदार महत्वाचा आहे म्हणूनच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी जनतेने आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन बनसोडे यांनी केले.

Visit : policenama.com
बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like