पिंपरी : गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजाराच्या लाचेची मागणी, अ‍ॅन्टी करप्शनकडून पोलिस उपनिरीक्षकाविरूध्द FIR

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलिस अधिकाऱ्याने गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. एसीबीने कारवाई करत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू केले आहे.

उपनिरीक्षक राहुल बधाने असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उपनिरीक्षक राहुल हे चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. दरम्यान यातील तक्रारदार यांच्याबाबत एक तक्रार अर्ज पोलीस ठाण्यात आला आहे. याची चौकशी उपनिरीक्षक राहुल हे करत आहेत. त्यावेळी त्यांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. त्याची पडताळणी केली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज “डिमांड”चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.